🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख ॲड. जयदेव गायकवाड यांनी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंतांचा संघर्ष या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शरद पवारांनी (sharad pawar) मुख्यमंत्री असतानाचा एक प्रसंग सांगितला.
बाबासाहेब शिक्षणासंबंधी अत्यंत आग्रही होते. त्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी अपार कष्ट केले. त्याचे सविस्तर वर्णन जयदेवने या पुस्तकात केले आहे. जयदेव स्वत: आंबेडकर चळवळीचा एक अभ्यासू आणि ज्येष्ठ नेता आहे. मी मुख्यमंत्री असताना डॉ. आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे जवळपास अठरा खंड आपण राज्य सरकारमार्फत प्रकाशित केले होते. महाराष्ट्रासमवेत अन्य राज्यातही हे प्रकाशन झालं होतं. त्यामुळे बाबासाहेबांचे एक विस्तृत चित्र साऱ्या देशासमोर मांडले गेले. असे शरद पवारांनी यावेळी म्हटले.
मी मुख्यमंत्री असताना डॉ. आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे जवळपास अठरा खंड आपण राज्य सरकारमार्फत प्रकाशित केले होते. महाराष्ट्रासमवेत अन्य राज्यातही हे प्रकाशन झालं होतं. त्यामुळे बाबासाहेबांचे एक विस्तृत चित्र साऱ्या देशासमोर मांडले गेले.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 20, 2022
बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे आपल्या देशाला स्थैर्य मिळालं. आज श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या देशात काय परिस्थिती आहे हे आपण पाहात आहोत. मात्र तशी वेळ आपल्या देशावर आलेली नाही आणि यापुढेही येणार नाही. याचं सर्व श्रेय हे बाबासाहेबांना जातं. असेही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “…ह्यापुढे होता कामा नाही”, पुण्यातील ‘त्या’ प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड संतापले
- IPL 2022 RCB vs GT : चाहते म्हणतायत…तेरा बाप आया! विराटच्या खेळीचं सोशल मीडियावर धडाकेबाज सेलिब्रेशन
- IPL 2022 RR vs CSK : चेन्नईला हरवत राजस्थानची दुसऱ्या स्थानी झेप; जयस्वाल, अश्विनची झुंजार फलंदाजी!
- IPL 2022 RR vs CSK : चेन्नईचं राजस्थानला १५१ धावांचं आव्हान; मोईन अलीचं हुकलं शतक!
- IPL 2022 RR vs CSK : “तू पुढची आयपीएल खेळणार का?” टॉसदरम्यान धोनीनं दिलं ‘थेट’ उत्तर; म्हणाला…!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
