🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा (RR vs CSK) ५ गड्यांनी पराभव करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. हंगामातील ६८वा हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगला. या सामन्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोईन अलीच्या (९१) शानदार खेळीच्या जोरावर चेन्नईने राजस्थानला १५१ धावांचे आव्हान दिले. ओबेद मॅकॉय आणि युझवेंद्र चहल यांनी चेन्नईच्या स्टार फलंदाजांना आवर घातला आणि मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखले. प्रत्त्युत्तर यशस्वी जयस्वाल आणि रवीचंद्रन अश्विनच्या झुंजार फलंदाजीमुळे राजस्थानने २ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. आता कोलकाताच्या इडन गार्डन्सवर रंगणाऱ्या क्वालिफायर १ मध्ये राजस्थानचा सामना गुजरातशी होईल.
राजस्थानचा डाव
जोस बटलर (२) पुन्हा एकदा राजस्थानसाठी मोठी सलामी देण्यास असमर्थ ठरला. सिमरजीत सिंगने त्याला बाद केले. कप्तान संजू सॅमसनने थोडावेळ यशस्वी जयस्वालसोबत अर्धशतकी भागीदारी करत चेन्नईच्या आव्हानाला तोंड दिले. फिरकीपटू मिचेल सँटनरने सॅमसनला (१५) बाद केले. त्यानंतर आलेला देवदत्त पडिक्कलची (३) मोईन अलीने दांडी गूल केली. अर्धशतक ठोकलेला जयस्वाल शतकानंतर बाद झाला. त्याने चौकार आणि एका षटकारासह ५९ धावा केल्या. प्रशांत सोलंकीने त्याच्यासह शिमरॉन हेटमायरला (६) पॅव्हेलियनमध्ये पाठवत राजस्थानला संकटात टाकलं. रवीचंद्रन अश्विनने झुंजार फलंदाजी करत राजस्थानला संकटातून बाहेर काढले. २०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौथ्या चेंडूवर राजस्थानने ५ गडी राखून विजयावर शिक्कामोर्तब केले.
Moeen's 93 goes in vain as Jaiswal and Ashwin carry Rajasthan Royals to their first top two finish since 2008! #IPL2022
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 20, 2022
चेन्नईचा डाव
राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (२) स्वस्तात बाद करत चेन्नईला लवकर धक्का दिला. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अलीने ८३ धावांची भागीदारी केली. मोईनने स्फोटक फटके खेळत अर्धशतक ठोकले. अश्विनने कॉनवेला (१६) पायचीत पकडले. त्यानंतर चेन्नईने मधल्या फळीत एन. जगदीशन (१), अंबाती रायुडू (३) यांना पटापट गमावले. १२व्या षटकात चेन्नईने शतकी पल्ला ओलांडला. मोईन अली आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी भागीदारी करत चेन्नईला चांगल्या धावसंख्येकडे नेले. १९व्या षटकात चहलने धोनीला तंबूत पाठवले, तर मॅकॉयने शेवटच्या षटकात मोईन अलीला शतकापासून वंचित ठेवले. मॅकॉयने या षटकात फक्त चार धावा दिल्या. धोनीने १ चौकार आणि एका षटकारासह २३ धावा केल्या. मोईन अलीने ५५ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ९२ धावा केल्या. २० षटकात चेन्नईने ६ बाद १५० धावा केल्या. राजस्थानकडून मॅकॉय आणि चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायुडू, एन. जगदीसन, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक/कप्तान), मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथिशा पाथिराना, मुकेश चौधरी.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
