Share

“…ह्यापुढे होता कामा नाही”, पुण्यातील ‘त्या’ प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पुण्यातील ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं छाटली होती, त्या लाल महालात लावणीचे शुटिंग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

“पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल हि वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे. ह्यापुढे होता कामा नाही,  कोणी केले असेल तर वापरू नका.”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान या प्रकरणावर पुण्यातील संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“लालमहालात लावणी नृत्य याचा निषेध. लालमहाल आमची अस्मिता आहे. जिजाऊंचे ते स्मारक आहे. याठिकाणी असले धंदे आम्ही खपवून घेणार नाही. तो मस्तानीचा शनिवार वाडा नाही. कृपया यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.”, अशी मागणी  अविनाश मोहिते यांनी केली आहे.

https://twitter.com/esantoshshinde/status/1526460447322304514

दरम्यान डान्सर वैष्णवी पाटील यांनी यांनी प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर लावणी करतानाचा व्हिडिओ याठिकाणी शूट केला आहे. यावरून आता राजकीय कक्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!