Share

IPL 2022 RR vs CSK : चेन्नईचं राजस्थानला १५१ धावांचं आव्हान; मोईन अलीचं हुकलं शतक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये, आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (RR vs CSK) यांच्यात हंगामातील ६८वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोईन अलीच्या (९१) शानदार खेळीच्या जोरावर चेन्नईने राजस्थानला १५१ धावांचे आव्हान दिले आहे. ओबेद मॅकॉय आणि युझवेंद्र चहल यांनी चेन्नईच्या स्टार फलंदाजांना आवर घातला आणि मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखले.

चेन्नईचा डाव

राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (२) स्वस्तात बाद करत चेन्नईला लवकर धक्का दिला. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अलीने ८३ धावांची भागीदारी केली. मोईनने स्फोटक फटके खेळत अर्धशतक ठोकले. अश्विनने कॉनवेला (१६) पायचीत पकडले. त्यानंतर चेन्नईने मधल्या फळीत एन. जगदीशन (१), अंबाती रायुडू (३) यांना पटापट गमावले. १२व्या षटकात चेन्नईने शतकी पल्ला ओलांडला. मोईन अली आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी भागीदारी करत चेन्नईला चांगल्या धावसंख्येकडे नेले. १९व्या षटकात चहलने धोनीला तंबूत पाठवले, तर मॅकॉयने शेवटच्या षटकात मोईन अलीला शतकापासून वंचित ठेवले. मॅकॉयने या षटकात फक्त चार धावा दिल्या. धोनीने १ चौकार आणि एका षटकारासह २३ धावा केल्या. मोईन अलीने ५५ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ९२ धावा केल्या. २० षटकात चेन्नईने ६ बाद १५० धावा केल्या. राजस्थानकडून मॅकॉय आणि चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11 

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय.

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायुडू, एन. जगदीसन, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक/कप्तान), मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथिशा पाथिराना, मुकेश चौधरी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!