Share

IPL 2022 RCB vs GT : चाहते म्हणतायत…तेरा बाप आया! विराटच्या खेळीचं सोशल मीडियावर धडाकेबाज सेलिब्रेशन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बंगळुरूसाठी ‘करो वा मरो’ असलेल्या सामन्यात विराट कोहलीला लय गवसली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर गुरूवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरूसमोर १६९ धावांच लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात विराटच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूनं हे लक्ष्य ८ गडी राखून पूर्ण केलं आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

या आयपीएल हंगामामध्ये (IPL 2022) चांगल्या कामगिरीसाठी झगडणाऱ्या विराटनं गुजरात विरूद्ध आत्मविश्वासानं खेळ केला. त्यानं ५४ चेंडूमध्ये ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीनं ७३ धावा केल्या. विराटच्या या खेळीमुळे त्याचे चाहते खूश असून सोशल मीडियावरही या खेळीच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

https://twitter.com/_masterofchase_/status/1527335465451282450?s=20&t=RK3d85IKaIlxnU3UxBsW1w

https://twitter.com/SanjanaVK_18/status/1527326307100418059?s=20&t=Ew4uMndbBW8Tsvm8ZRLaFg

बंगळुरूच्या खात्यात आता १४ सामान्यांमध्ये ८ विजयांसह १६ पॉईंट्स झाले आहेत. प्लेऑफच्या उरलेल्या १ जागांसाठी आता दिल्ली आणि बंगळुरू या दोन संघामध्ये शर्यत आहे. बंगळुरूच्या खात्यात १६ पॉईंट्स आहेत तर दिल्लीकडे १४ पॉईंट्स आहेत. मात्र दिल्लीचा एक सामना शिल्लक आहे. हा सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात खेळला जाईल. जर या सामन्यात दिल्ली जिंकला तर बंगळुरू संघाचे प्लेऑफ आव्हानं संपुष्टात येईल. आणि जर दिल्ली सामना हारली तर बंगळुरू सहज प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!