🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील ६८ वा सामना चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सूरू आहे. हा सामना चेन्नईचा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांना ज्या प्रश्नाचे उत्तर हवे होते ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी पुढील हंगामात चेन्नईच्या जर्सीत खेळणार की नाही. आजच्या सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी धोनी मैदानात उतरला आणि नाणेफेक जिंकून त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक, प्लेइंग इलेव्हन आणि फ्रँचायझीच्या यंदाच्या हंगामातील प्रदर्शनाबाबत नेहमीच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर धोनीला त्याच्या चेन्नई संघासोबतच्या भविष्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा धोनीने पुढच्या हंगामात जोरदार पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम करणार असल्याचे सांगितले.
“निश्चितपणे, हे एक साधे कारण आहे. चेन्नईमध्ये न खेळणे आणि धन्यवाद म्हणणे अन्यायकारक ठरेल,” असे धोनीने नाणेफेकीवेळी सांगितले. पुढे बोलताना तो म्हणाला, “मुंबई हे एक असे ठिकाण आहे जिथे एक संघ म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून मला खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. चेन्नईच्या चाहत्यांनाही या हंगामात संघाला चांगली साथ दिली. आणि, आशा आहे की पुढच्या वर्षी, ही एक संधी असेल जिथे संघाला प्रवास करायला मिळेल. त्यामुळे, संघातील वेगवेगळ्या ठिकाणी खेळ खेळणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यासारखे असेल. हे माझे शेवटचे वर्ष असेल की नाही हा एक मोठा प्रश्न आहे कारण आम्ही दोन वर्षांच्या अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल भाकीत करू शकत नाही. परंतु मी निश्चितपणे पुढील वर्षी मजबूत पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम करेन,” असे धोनीला त्याच्या भविष्याबद्दल विचारले असता तो म्हणाला.
Y. E. S! ???? ????
???????? ???????????????????? ???????????????? ???????? ????????????????! ???? ????
Follow the match ▶️ https://t.co/ExR7mrzvFI#TATAIPL | #RRvCSK | @msdhoni | @ChennaiIPL pic.twitter.com/mdFvLE39Kg
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने ४ आयपीएल विजेतेपद जिंकली आहेत. त्याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घेतली. तेव्हापासून तो फक्त आयपीएल हे एकमेव स्पर्धात्मक क्रिकेट खेळत आहे. धोनीने मागील हंगामात चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले होते. परंतु आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी धोनीने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचा कर्णधार म्हणून जडेजाचा कार्यकाळ अत्यंत खराब राहिला आणि संघ लवकरच प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर पडण्यापूर्वी जडेजाने “स्वतःच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी” धोनीकडे कर्णधारपद सोपवले.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
