🕒 1 min read
मुंबई : क्रिकेट भारतीयासाठी धर्म आहे आणि सचिन हा क्रिकेटचा देव. सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत इतके अनोखे विक्रम नावावर केले याची नोंद ठेवणे शक्य नाही. मात्र नुसत्या मैदानातील धावाच नव्हे तर सचिनने जगभर असंख्य चाहतेही कमवले आहे. असाच एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
गोष्ट आहे २०१५ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील. या विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकरला आयसीसीने ब्रँड एम्बेसिडर म्हणून नेमले होते. अंतिम सामना पाहण्यासाठी सचिन स्वत: मेलबर्नच्या मैदानावर पोहोचला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यानंतर संघातील खेळाडूंच्या मैदानावर मुलखती सुरु होत्या. यादरम्यान सचिन तेंडुलकर मैदानातुन चालत जात असताना मुलाखत देत असलेल्या ऑस्ट्रेलीयन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे लक्ष सचिनकडे गेले, आणि तो मुलाखत अर्धवट सोडून सचिनच्या दिशेने धावत सुटला.
This is the impact he has in this beautiful game. Maxwell hugs Sachin leaving his interview and it's in Australia.#HappyBirthdaySachin pic.twitter.com/vXaO52XXAM
— Souvik Maity (@souvik7maity) April 24, 2020
सचिनकडे जात मॅक्सवेलने त्याची गळाभेट घेतली. आणि पुन्हा एकदा मुलाखत देण्यासाठी माघारी परतला. तब्बल २४ वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रमाना गवसणी घातली. सचिनला निवृत्त होऊन ७-८ वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र आजही सचिन दिसताच त्याचे चाहते त्याच्या दिशेने त्याला धाव घेतात. अनेकदा तो आयपीएल सामन्यात मुंबईच्या डगआऊट मध्ये दिसतो त्यावेळीही स्टेडीअम सचिन सचिन या घोषणांनी दुमदुमुन जाते.
महत्वाच्या बातम्या
- …तर मी उद्धव ठाकरेंना नारळाचं पाणी दिलं असतं; नारायण राणेंचा टोला
- हिंगोलीत कोविड वार्डमध्ये फिरणाऱ्या ४९ नातेवाईकांवर गुन्हा
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- बुलडाण्यात खळबळ ; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न
- धक्कादायक ; आरेच्या सीईओच्या घरात सापडली तीन कोटींची रोकड, एसीबीची कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
