Share

हिंगोलीत कोविड वार्डमध्ये फिरणाऱ्या ४९ नातेवाईकांवर गुन्हा

Published On: 

हिंगोली : हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये नातेवाइकांसोबत थांबून सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या ४९ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात २४ मे राेजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. यामध्ये १३ महिलांचाही समावेश आहे.

कोविड वॉर्डमध्ये रुग्णांसोबत कोणीही थांबू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वेळोवेळी दिल्या आहेत. ज्या रुग्णांचे नातेवाईक दिवसभर थांबून त्यानंतर गावाकडे निघून जात होते. त्यामुळे त्यांच्याकडूनच कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात थांबणाऱ्या नातेवाइकांना थेट विलीनीकरण कक्षात पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतरही जिल्हाधिकारी जयवंशी, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या सरप्राइज व्हिजिटमध्ये सुमारे ३५ पेक्षा अधिक नातेवाईक रुग्णालयाच्या परिसरात आढळून आले होते. काही दिवसांपूर्वीच एका नातेवाइकाने विलीनीकरणाच्या भीतीने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यामुळे वाॅर्डमध्ये आढळून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!