मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या घरावर छापा मारलाय. नथू राठोड यांच्या घरातून एसीबीकडून सव्वा तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आलीय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल गुन्ह्यातील तपासाच्या अनुषंगाने यातील आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यानंतर नथू राठोडच्या घरात 3 कोटी 46 लाख 10 हजार इतकी बेहिशेबी रोकड सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. ही रक्कम जप्त करण्यात आली असून, नथू राठोड यांची कसून तपासणी केली आहे.
राठोड यांच्यासह इतर दोघांनाही भ्रष्टाचार विरोधी पथकाने लाच घेताना पकडलं आहे. ह्यापैकी एका आरोपीचं नाव अरविंद तिवारी असल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादीने सांगितलं की त्याला आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी राठोड यांची परवानगी हवी होती. त्यावेळी राठोड यांनी फिर्यादीला तिवारी यांना भेटण्यास सांगितलं होतं. तिवारीने फिर्यादीला ५० लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर फिर्यादीने याबद्दलची माहिती भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली.
त्यानंतर पथकाने ट्रॅप लावत ५० हजारांची लाच घेणाऱ्या तिवारीला पकडलं. यानंतर पथकाने तिवारीला पैसे घेऊन राठोडकडे पाठवलं. तेव्हा राठोडने ही रक्कम स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यावरुन हे लक्षात आलं की तिवारीने राठोडच्या सांगण्यावरुन लाच स्वीकारली होती. त्यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकाने राठोड यांना ताब्यात घेतले आहे. आरेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या घरात इतके मोठे घबाड आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी एसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- गिरीश कुबेर यांनी हे धाडस कोणाच्या जीवावर केले याची माहिती मिळाली पाहिजे : नारायण राणे
- ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले, तरच लॉकडाऊन उठू शकतो : अस्लम शेख
- अबब…! लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी दर तासाला कमावतायत ‘इतका’ बक्कळ पैसा
- ७ मे चा निर्णय हा असंवैधानिक; ‘त्या’ जीआरवरून काँग्रेसचा राज्य सरकारला घरचा आहेर
- सकारात्मक : पुण्यात सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या आत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

