🕒 1 min read
बुलढाणा : सतत या ना त्या विधानांमुळे चर्चेत राहणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी महागडी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.
संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या आगीत गाडीच्या मागील भागाने नुकसान झाले आहे. आमदार संजय गायकवाड हे कामानिमित मुंबईला गेले होते. ते रात्री दीड वाजता ते घरी परत आले. यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी टू व्हीलरवर येऊन वाहनाची पेट्रोलची टॅंक जिथे असते, त्या ठिकाणी पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी पेटवून दिली.
या कारच्या मागे पुढे चार ते पाच गाड्या उभ्या होत्या.जर या गाड्या पेटल्या असत्या तर तर मोठा अनर्थ झाला असता. गायकवाड कुटुंबाला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. यानंतर आता संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले कि, ‘रोखठोक काम करण्याचा, खरं बोलण्याचा माझा जो स्वभाव आहे, तो एखाद्याला पटला नसेल किंवा आज माझ्या मतदारसंघात जी धडाक्यानं कामं सुरू आहेत, ती गेल्या ५० वर्षांत झाली नाहीत, ती एखाद्याला पाहवली नसतील म्हणून हा प्रकार केला गेला असावा.
मात्र, हल्लेखोरांनी माझ्याशी सामना करावा. खुलेआम कुठेही बोलवावे. कुटुंबाशी खेळू नये. कुटुंबावर भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न करू नये,’ असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. तसेच पोलीस आपले काम करत असून लवकरच ते हल्लेखोरांना पकडतील,’ असा विश्वासदेखील संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड हे आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत आहे. ‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते,’ अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यानंतर बुलडाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच पेटला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्धव बेटा, मला तुला भेटायचंय’; …म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेचं आर्जव
- हिंगोलीत कोविड वार्डमध्ये फिरणाऱ्या ४९ नातेवाईकांवर गुन्हा
- ‘मराठा समाजाला ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ मिळावा’, आ.मेटेंची खंडपीठात याचिका
- सुबोध कुमार जयस्वाल CBI संचालक झाल्याने ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होणार?
- धक्कादायक ; आरेच्या सीईओच्या घरात सापडली तीन कोटींची रोकड, एसीबीची कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
