मुंबई : पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांना मोठा तडाखा दिला. महाराष्ट्रात कोकणासह मुंबईत या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. या वादळाने झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार हे तत्पर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
तर, मुख्यमंत्र्यांनी केवळ तीन तासांतच आपला दौरा आटोपल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, मागील वर्षीच्या निसर्ग चरकीवादळानंतर अनेक नुकसानग्रस्त हे मदतीपासून वंचित राहिले होते. यावेळी तरी योग्य मदत करावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
दरम्यान, भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे ‘नौटंकी’ असल्याची टीका त्यांनी केली आहे. ‘तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकणात आले होते. मात्र त्यांनी अजूनही वादळात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मदतीची घोषणा केली नाही. फक्त मदत देऊ असं बोलून होत नाही. लगेच दोन दिवसांत तुम्ही पॅकेज जाहीर का केलं नाही ?’ असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केलाय.
पुढे त्यांनी, ‘मुख्यमंत्री पर्यटकांसारखे फक्त वाळूवर फिरून आले. ते चिवला ला येऊन गेले. माझं तिकडे घर आहे. नारायण राणेंनी घर कसं बांधलं, ते बघायला आले असतील. मला याबाबत माहिती असतं, तर मी घरी थांबलो असतो आणि त्यांना नारळाचं पाणी दिलं असतं.’ असा मिश्किल टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हिंगोलीत कोविड वार्डमध्ये फिरणाऱ्या ४९ नातेवाईकांवर गुन्हा
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- बुलडाण्यात खळबळ ; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न
- धक्कादायक ; आरेच्या सीईओच्या घरात सापडली तीन कोटींची रोकड, एसीबीची कारवाई
- ‘उद्धव बेटा, मला तुला भेटायचंय’; …म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेचं आर्जव


