Share

‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला ‘सत्ताधारी’ ठरवलं म्हणून आम्ही गप्प बसायचं का? आम्हाला कायद्याशी देणघेणं नाही. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी लागू केलेली रचना आजच्या महाराष्ट्राला लागू झालीच पाहिजे. बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते बुधवारी औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘समाज हा समाज आहे, त्याला राजकीय वळण देऊ नका. किंबहुना आताची वेळच अशी आहे की राज्यकर्त्यांनी भूमिका मांडणं अतीशय गरजेचं आहे. मराठा समाजासाठी तुम्ही काय करणार ते स्पष्ट करणं गरजेचं आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. सध्याच्या घडीला हा विषय न्यायप्रविष्ट असला तरीही कोविड काळ निवळेल त्या वेळी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावच लागेल, 30 टक्के गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा शब्दांत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्याचा हेतू अधोरेखित करत आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला.

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत माझे – तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने समाजासाठी काय करता येईल यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. याकरिता दोन दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!