मुंबई : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते. कोरोना काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं.
या कार्यक्रमावेळी बांगलादेशची राजधानी ढाका येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या होत्या. ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य संघर्षात सहभागी होणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या टप्प्याली पहिल्या आंदोलनांपैकी एक आहे. मी २०-२२ वर्षांचा असताना माझ्या इतर सहकाऱ्यांसह बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारतात सत्याग्रह केला होता’ असं मोदी म्हणाले होते.
त्यांच्या या विधानावरून विविध नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाली होती ? याची माहिती त्यांनी द्यावी, असं पाटील म्हणाले आहेत.
आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा !
मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल.— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 29, 2021
‘आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा ! मात्र आपल्या पंतप्रधानांना बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाली? त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते ? याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल.’ अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

