पुणे : राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे. अशातच गुजरातमधून राज्याच्या राजकारणाला हलवून टाकणारी एक बातमी समोर आली आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने हे वृत्त फेटाळलं असलं तरी ‘ऑपरेशन लोटस’ ची नांदी होत असल्याची कुजबुज आता सुरु झाली आहे.
या भेटीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना सूचक भाष्य केलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना राष्ट्रवादी-भाजप एकत्र येऊन पुन्हा शपथविधी होऊ शकतो का ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत असं सांगताच चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘असे अंदाज असतात मात्र आता त्यातील कोणतीही वस्तुस्थिती नाही. जेव्हा ठरेल, तेव्हा नॉर्मली कळेल किंवा त्यावेळच्या शपथविधी सारखं नंतर कळेल.’ त्यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रातील उत्सुकता आणखीच वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- रितेश-जेनेलियाने रोमाँटिक अंदाजात साजरी केली होळी ; व्हिडिओवर चाहते फिदा…
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार,त्यांना लवकर बरं वाटू दे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

