बीड : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला २९ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक (डीएफओ) विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री तीनच्या सुमारास धारणी पोलिसांनी शिवकुमार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
दीपाली यांनी त्यांच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी छातीवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. दीपाली दोन वर्षांपासून हरिसाल येथे कार्यरत होत्या. त्यांचे पती राजेश मोहिते (३०, रा. मोरगाव, जि. अमरावती) हे चिखलदरा येथे कोषागार कार्यालयात नोकरीला आहेत.
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. दिपाली चव्हाण यांना न्याय मिळावा यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहेत. अशातच सामजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ, खासदार नवनीत राणा, आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केली आहे. ‘हत्तीण मेल्यावर कळवळा आणणारे तथाकथित वन्य जीव प्रेमी , स्वयंसेवी दिपाली चव्हाण या तरुण अधिकारी मृत्यू प्रकरणी मात्र सोयीस्कर मौन बाळगून आहेत. चित्रा वाघ, नवनीत राणा, देसाई आणि तथाकथित स्त्रीमुक्तीच्या कैवाऱ्यांना बहुधा यात काही पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’. असा घणाघात अंधारे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- रितेश-जेनेलियाने रोमाँटिक अंदाजात साजरी केली होळी ; व्हिडिओवर चाहते फिदा…
- मी एका तासापेक्षा जास्त प्रचार करू शकत नाही, इतकं तर मी ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही – नुसरत जहाँ
- मराठी कलाकार झाले रंगात बेधुंद ; जोडीदारासोबत पहिलीच होळी
- ‘अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही’
- भारताचा स्टार गोलंदाज आयपीएलसाठी सज्ज…


