पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ३० मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. तर भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. समाधान महादेव आवताडे यांचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.
भाजपकडून समाधान आवताडे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक तसेच जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि पदाधिकारी उद्या सकाळी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान अजूनपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने वाद निर्माण झाला आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होईल असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- होळी न खेळण्याचं आवाहन अक्षय कुमारच्या अंगलट ; नेटकऱ्यांनी झापलं
- रितेश-जेनेलियाने रोमाँटिक अंदाजात साजरी केली होळी ; व्हिडिओवर चाहते फिदा…
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- राज्यातले महा वसुली आघाडी सरकार लवकरच अग्नीत जळून भस्मसात होईल – आचार्य भोसले
- ‘बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार,त्यांना लवकर बरं वाटू दे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

