Share

मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?

Published On: 

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके याच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून भालके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी जवळपास निश्चित आहे. शिवसेना व स्वाभिमानीने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसह अनेक अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान,आमदार परिचारक गटाने समाधान अवताडे याना पाठिंबा देण्याचे मान्य करत पंढरपुर शहरासह 22 गावांतून मताधिक्य देण्याचा शब्दही पक्षश्रेष्ठींना दिला आहे. त्यामुळेच आवताडेंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अवताडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असल्याचा फायदा त्यांना होऊ शकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कोण आहेत समाधान अवताडे?

समाधान आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक व चेअरमन आहेत. तसेच ते उद्योजक म्हणून पण ओळखले जातात. समाधान आवताडे यांनी 2014 साली शिवसेनेकडून पंढरपूर, मंगळवेढा निवडणूक लढवली होती. 2019 साली अवताडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, यामध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. ग्रामीण भागामध्ये अवताडे गटाचे चांगलेच वजन आहे. पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या आधीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!