🕒 1 min read
मुंबई : राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे. अशातच गुजरातमधून राज्याच्या राजकारणाला हलवून टाकणारी एक बातमी समोर आली आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने हे वृत्त फेटाळलं असलं तरी ‘ऑपरेशन लोटस’ ची नांदी होत असल्याची कुजबुज आता सुरु झाली आहे.
मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही .
आता तरी रहस्य कथेचा शेवट करा.अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही. pic.twitter.com/hV52BUYO8Q— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2021
या भेटीवर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे. ‘मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही . आता तरी रहस्य कथेचा शेवट करा.अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही.’ असा सल्लाच त्यांनी भाजपला दिला आहे. तसेच, त्यांनी माध्यमांशी बोलताना अमित शाहांना लक्ष्य केलं. ‘बंद खोलीतील चर्चेवर देखील ते सार्वजनिक बोलले नव्हते, मात्र आता ते यावर बोलू लागले आहेत. त्यामुळे या भेटीवर देखील ते बोलतीलच,’ अशी उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली शरद पवारांची फोनद्वारे विचारपूस !
- रितेश-जेनेलियाने रोमाँटिक अंदाजात साजरी केली होळी ; व्हिडिओवर चाहते फिदा…
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- राज्यातले महा वसुली आघाडी सरकार लवकरच अग्नीत जळून भस्मसात होईल – आचार्य भोसले
- ‘बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार,त्यांना लवकर बरं वाटू दे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
