Share

गाडीला कट का मारला विचारताच, कुऱ्हाडीने वार करून दोघांचे डोके फोडले

Published On: 

वैजापूर : तालुक्यातील भिवगाव येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणात कुऱ्हाडीने वार करून दोघांचे डोके फोडल्याची घटना (दि.२२) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी योगेश भिकन शेळके, निवृत्ती भिकन शेळके, गणेश शिवाजी शेळके, संभाजी भिकन शेळके, सोपान भिकन शेळके यांच्याविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय चंद्रभान कदम, रा.भिवगाव हे शेती व्यवसाय करून स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचा पुतण्या गणेश कदम हा मोटरसायकलने गावात जात असताना समोरून दुचाकीने येत असलेला योगेश शेळके याने त्याला कट मारला व तो न थांबता निघुन गेला.

घडलेल्या प्रकारामुळे संजय यांच्या मुलाने योगेश याला फोन करून सांगितले की, ‘आम्ही तुमच्या वडिलांकडे येतो व आमचे काही चुकत असेल तर आम्हाला सांगा, तुमच्या अशा वागण्याने भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो’ इतके सांगून ते व इतर जण योगेश याच्या घराकडे जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच त्यांना योगेश व त्याचे नातेवाईक कुऱ्हाड व लाठ्याकाठयांंसह भेटले. यावेळी योगेश याने संजय व त्यांचा मुलगा वैभव या दोघांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून दोघांचे डोके फोडले. त्यांच्या सोबतच्या इतर लोकांना लाठ्याकाठयाने मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!