परभणी : दोन राष्ट्रीय महामार्गांच्या मंजूरीसाठी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. विदर्भ, आंध्रप्रदेश व इतर महत्त्वाची ठिकाणे, धार्मिकस्थळे येथील दळणवळणासाठी जिंतूर- सेलु मतदारसंघातून जाणाऱ्या ७५२- १ व ५४८- ब या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना मंजूरी द्यावी. त्याचप्रमाणे जिंतूर- परभणी रस्त्याचे संथगतीने सुरु असलेले काम लवकर पूर्ण करण्याची मागणी आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी गडकरी यांना केली.
राष्ट्रीय महामार्ग ७५२- १ हा वाटुर- देवगाव- चारठाणा पाटी- जिंतुर- औंढा- शिरडशहापुर पर्यंत ९७ किलोमीटर लांबीपैकी केवळ वाटुर ते चारठाणा पाटीपर्यंतच्या २७ किलोमीटर अंतराच्या कामास मंजुरी देण्यात आली. उर्वरीत ७० किलोमीटर रस्त्यास मंजुरी मिळाल्यास विदर्भासह हिंगोली जिल्ह्यातुन येणाऱ्या राज्यमार्ग २४८ ला जोडला जाईल.
तसेच परभणी या जिल्ह्याच्या ठिकाणावरुन येणाऱ्या ७५२- क या राज्यमार्गाला देखील जोडला जाणार आहे. त्यामुळे उर्वरीत ७० किमी. लांबीच्या कामास तत्काळ मंजुरी दिल्यास बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे तिर्थक्षेत्र राष्ट्रीय माहामार्गाला जोडले जाईल, शिवाय मराठवाड्यातील पाचही जिल्हे या राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाऊन मराठवाडा, विदर्भ व आंध्रप्रदेशातील दळणवळण सोयीचे होईल असे त्या म्हणाल्या.
तर ५४८- ब महामार्ग देवगाव- सेलु- पाथरी- इंजेगाव हा सेलु शहरामधून जातो. सेलु येथील शिक्षण संस्था मध्ये मराठवाड्यात नावाजलेली असून श्रीसंत साईबाबा यांचे गुरु बाबासाहेब महाराज यांचे जन्मस्थान आहे. येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे सदर रस्त्यास मंजुरी दिल्यास या तीर्थक्षेत्रांच्या विकासासोबतच दळणवळणास मोठी चालना मिळणार असल्याचे आढळून. बोर्डीकरांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून देत या महामार्गांच्या कामास मंजुरी देण्याची विनंती केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्यांचा स्वबळाचा आग्रह ‘शेवटपर्यंत’ टिकला तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रच लढणार’
- मोठी बातमी! नाराज जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
- कोरोनाने मृत झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या वारसदारांना ५० लाखांचा विमा प्राप्त
- बीडच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुखांचा बदल, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
- पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण


