मुंबई : रतन टाटा यांनी टाटा समूहामार्फत कोरोना काळात भारताला केलेली मदत ही वाखाणण्याजोगी आहे. राष्ट्रप्रथम म्हणत सेवा करणाऱ्या टाटांनी जगातील सर्वच उद्योगसमूहांसह प्रत्येक भारतीयांसमोर देशप्रेमाचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. म्हणूनच सैन्याच्या सामुग्रीपासून ते मीठापर्यंत टाटांना प्राधान्य दिले जाते. हा वारसा जमशेदजी टाटा यांच्यापासून चालत आला आहे.
टाटा उद्योग समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या १०० वर्षांत सर्वाधिक दान करून जमशेदजी टाटांनी जगभरात दानशूरतेचा आदर्श निर्माण केला आहे. हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनच्या वतीने दान करणाऱ्या ट़ॉप ५० लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार जमशेदजी टाटा यांनी गेल्या १०० वर्षांत तब्बल १०२ बिलियन डॉलर्सचं दान दिलं आहे.
प्रामुख्याने टाटांनी आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी १८९२ पासून दिलेल्या मोठ्या देणग्यांचा या हुरुन रिपोर्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. दानशूर लोकांच्या यादीमध्ये टाटा यांनी बिल गेट्स, वॉरेन बफे यांना देखील मागे टाकले आहे. तर देशातील दानशूर व्यक्तींमध्ये विप्रोचे अजीम प्रेमजी यांचा देखील समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला; सत्ताधारी आणि विरोधकांपैकी नेमकं खोटं कोण बोलतंय ?
- धोका कायम ! पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ
- अजित पवार, अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजप का करत आहे ?
- दोन राष्ट्रीय महामार्गांच्या मंजूरीसाठी मेघना बोर्डीकरांनी घेतली नितीन गडकरींची भेट
- प्रसेनजीत पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्यामुळे बुलढाण्यातील राजकीय समीकरणे बदलणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

