उस्मानाबाद : राज्यात काँग्रेसकडून सतत स्वबळाची भाषा वापरली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडेबोल सुनावल्यानंतरही काँग्रेस नेत्यांची भूमिका कायम आहे. मात्र, आता यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस आम्ही तिन्ही पक्ष एकत्रच राहू. जर त्यांचा आग्रहच असेल स्वबळावर लढण्याचा आणि तो ‘शेवटपर्यंत’ टिकला तर किमान राष्ट्रवादी व शिवसेना तरी एकत्रच लढेल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी काँग्रेसला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात आज तुळजापूर येथून तुळजाभवानीच्या द्वारातून करण्यात आली. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, रुपाली चाकणकर, महेबुब शेख इत्यादी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ही यात्रा म्हणजे स्वबळाची चाचपणी नव्हे तर पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष समजूतदार आहेत. आम्ही एकत्रच राहू. काँग्रेसही आमच्यासोबतच राहील, अशी मला खात्री वाटते.
नाना पटोले दिल्लीला रवाना
महाविकास आघाडीतील तणाव वाढत असतानाच नाना पटोले यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून दिल्लीला रवाना होत आहेत. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! नाराज जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
- कोरोनाने मृत झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या वारसदारांना ५० लाखांचा विमा प्राप्त
- बीडच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुखांचा बदल, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
- पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
