🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोना रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तर, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन देखील लागू करण्यात येत आहे. अशातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सार्वजनिक ठिकाणी देखील मास्क वापरत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.
यामुळे, काही नेत्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य देखील केलं होतं. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने संपूर्ण राज्यात कोणते कडक निर्बंध लागणार याबाबत काहीशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेला संबोधित केले आहे. तर, त्यांनी मास्क न घालणाऱ्यांवर नाराजी व्यक्त करतानाच अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
‘मी कोरोना लसीचे डोस घेतले आहेत. तरीदेखील सार्वजनिक ठिकाणी मास्क काटेकोरपणे घालतोय. लस घेऊनही मास्क घालणं आवश्यक आहे. काही जणांना असे वाटतं मास्क काय घालतोय ? मी मास्क लावणार नाही. मात्र मास्क न वापरण्यात कसलं मास्क न वापरण्यात कसलं शौर्य आलंय?’ असं भाष्य करत त्यांनी मास्क सक्तीने घालण्याचं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नद्यांचा श्वास कोंडलाय; अखेर अजित पवारांनी दिल्या जलपर्णी हटवण्याच्या सूचना
- मोठी बातमी : शेतकरी आंदोलन नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- …म्हणूनच मी धीर धरण्याचे आवाहन केले होते; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद सुरु
- पवार-शाह भेट महाराष्ट्राच्या हिताचीच – नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
