🕒 1 min read
मुंबई : राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे.
अशातच, गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याचे वृत्त पसरले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने ही भेट झाली नसल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे.
दरम्यान, भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमित शाह व शरद पवार यांच्या भेटीवर देखील भाष्य केलं आहे. ‘या भेटीबाबत मला अधिक माहिती नाही. शरद पवारांची मी रुग्णालयात भेट घेतली, मात्र तिथे हा विषय काढणं योग्य नव्हतं. त्यामुळे याबाबत मला अधिक माहिती नसली तरी ही भेट झालीच असेल तर ती महाराष्ट्रासाठी पोषक आहे. आमच्यासाठी देखील पोषक असून शिवसेनेला मात्र पोषक नसेल,’ असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊन करायला मुख्यमंत्रीच उतावीळ झालेत; नारायण राणेंचा हल्लाबोल
- राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या! नाना पटोलेंची केंद्राकडे मागणी
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होणार ; अमित शहांची भविष्यवाणी
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध

