Share

नद्यांचा श्वास कोंडलाय; अखेर अजित पवारांनी दिल्या जलपर्णी हटवण्याच्या सूचना

Published On: 

पुणे : शहरांची वाढ ही मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वच सेवांवर अधिकचा भार वाढत आहे, राज्यातील पुणे-मुंबईसारखी शहरं याचेच उदाहरण आहेत. दरम्यान, जितकी जास्त लोकसंख्या तितके जास्त प्रदूषण, कचरा. याचाच ताण स्थानिक प्रशासनावर पडत आहे. दरम्यान, याचा विपरीत परिणाम हा शहरांमधील नद्यांमध्ये होत आहे.

कधी काळी स्वच्छ वाहणाऱ्या पुण्यातील नद्या देखील याच प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. मुळा-मुठा या शहरातून वाहणाऱ्या नद्यांसाठी कोट्यवधींच्या निधींची घोषणा करण्यात आली, देश-विदेशातील संस्थांद्वारे पुढाकाराने विविध उपक्रम हाती घेतले गेले. मात्र, या नद्यांवर त्याचा काही एक परिणाम झालेला नाही.

सध्या प्रशासनावर कोरोनाचा ताण असल्याने इतर सुविधा पुरवण्यात काहीसं अपयश येत आहे. कोरोनाचा आजार पुन्हा एकदा बळावला असतानाच नद्या-तलाव यांमधील जलपर्णी ही डासांची उत्पत्ती करण्यासह अनेक आजारांना निमंत्रण देत आहे. नागरिकांनी वारंवार यावर आवाज उठवल्यानंतर अखेर आज जिल्हा आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी जलपर्णी काढण्यासाठीच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

‘पुणे जिल्ह्यामधील मुळा-मुठा, भीमा नदीपात्रातील जलपर्णीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी या नद्यांतील जलपर्णी काढण्यासाठी तत्काळ नियोजन करावे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. पुणे महानगरपालिकेनं पाषाण तलाव, कात्रज तलाव, जांभुळवाडी तलावातील जलपर्णी व गाळ काढून तलावाची स्वच्छता करुन घ्यावी. तसंच नद्यांच्या पात्रांमधील जलपर्णी काढण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डानं नियोजन करावं, असे निर्देश दिले आहेत,’ अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!