Share

मोठी बातमी : शेतकरी आंदोलन नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राच्या निषेधार्थ व आंदोलनाच्या समर्थनात देशभर आक्रोश व्यक्त केला जात आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणार शेतकरी नेते राकेश टिकैतयांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे.

किसान सभेचे नेते राकेश टिकैत हे राजस्थानातील हरसौरा इथून एका सभेला संबोधित करुन बानसूरकडे निघाले होते. त्यावेळी काही लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची माहिती टिकैत यांनी दिलीय. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहे. तसंच टिकैत यांच्यावर शाईही फेकण्यात आली. या हल्ल्या प्रकरणी अलवरच्या मस्त्य विद्यापीठातील छात्रसंघाचे अध्यक्ष कुलदीप यादवसह ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

https://twitter.com/RakeshTikaitBKU/status/1377942417026940928?s=20

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवल आहे. सुरक्षाकडे बनवत पोलिसांनी राकेश टिकैत यांना तिथून बाहेर काढलं आणि बानसूर इथं त्यांना सुरक्षित पोहोचवण्यात आले. ‘राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात ततारपूर चौराहा, बानसूर रोडवर भाजपच्या गुंडांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. लोकशाहीच्या हल्ल्याचं चित्र’, अशा आशयाचे ट्वीट करून सदर घटनेची माहिती स्वत: राकेश टिकैत यांनी दिली आहे. टिकैत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये हल्लेखोरांनी गाडीवर दगडफेक आणि गोळी चालवल्याचाही आरोप देखील करण्यात आलेला आहे.

दरम्यान केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्यांची दखल अद्यापही केंद्र सरकारने घेतली नाही. केंद्राच्या निषेधार्थ व आंदोलनाच्या समर्थनात देशभर आक्रोश व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!