मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले आहेत, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता जनतेशी सवांद साधत आहेत.
‘मी तुम्हाला घाबरवायला आलेलो नसून राज्यातील परिस्थिती समोर मांडण्यासाठी आलो आहे. मधल्या काळात आपण कोरोनाला आटोक्यात आणले होते. सर्वांनी एकत्रपणे या संकटाला तोंड दिले होते. मात्र, यानंतर पुन्हा सर्व काही सुरु झालं. समारंभ, सेलिब्रेशन सुरु झाले आणि पुन्हा एकदा कोरोनाची वाढ सुरु झाली. यामुळेच मी किमान एप्रिल अखेरपर्यंत संयम-धीर राखण्याचे आवाहन केले होते,’ असं भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबोधन –
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/875939296581041/
महत्वाच्या बातम्या
- नद्यांचा श्वास कोंडलाय; अखेर अजित पवारांनी दिल्या जलपर्णी हटवण्याच्या सूचना
- मोठी बातमी : शेतकरी आंदोलन नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होणार ; अमित शहांची भविष्यवाणी
- पवार-शाह भेट महाराष्ट्राच्या हिताचीच – नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

