Share

‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना २९ मार्च रोजी पोटदुखीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर पित्ताशयामध्ये समस्या आढळून आली. त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ३१ मार्च रोजी ऑपरेशनसाठी वेळ दिला होता, परंतु मंगळवारी पोटदुखी सुरु झाल्याने त्यांना निर्धारित ऑपरेशनच्या एक दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील विविध नेते शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत आहेत. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील आज ब्रीच कँडी गाठून पवारांची विचारपूस केली आहे. यानंतर संजय राऊत यांनी फेसबुक पोस्ट शेअर करून पवारांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.

https://www.facebook.com/sanjayraut.official/posts/737297533634098

‘देशाचे ज्येष्ठ नेते,महाविकास आघाडी सरकारचे आधारवड मा. शरद पवार यांची इस्पितळात जाऊन भेट घेतली. मा.पवार साहेबांची प्रकृती उत्तम असून. लवकरच ते घरी परततील. इस्पितळातील मुक्कामातही देशाच्या व राज्याच्या घडामोडींवर त्यांची बारीक नजर आहे हे दिसले.’ असं संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!