Share

काँग्रेसनं डोळे वटारताच शिवसेनेची भाषा बदलली हे नामांतर काय करणार?- केशव उपाध्ये

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे, संभाजीनगर व्हावे अशी मागणी करणाऱ्या व राज्यासह औरंगाबाद महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची मात्र मोठी कोंडी झाली आहे.

दरम्यान, काल राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंटवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करण्यात आला होता. त्यावरून काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी याबद्दल वृत्तवाहिन्यांशी बोलताना खुलासा केला. ‘टाइप करताना कधीतरी चूक होत असते. मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्विटर हँडल चालवणाऱ्या व्यक्तीला समज देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. त्यावरून महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे.

‘काँग्रेसनं ठणकावलं की लगेच शिवसेनेनं साष्टांग दंडवत घातले. साधं ट्विटरवर संभाजीनगर म्हणू शकत नाही? काँग्रेसनं डोळे वटारताच संभाजीनगरचा उल्लेख करणाऱ्याला समज देण्याची भाषां? हे नामांतर काय करणार?,’ असं सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!