मुंबई: नुकतच कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, त्याचबरोबर अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफिसला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत.
एकीकडे केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत आहे. मात्र याच वेळी याचा गैरफायदा ऑनलाइन हॅकिंग आणि फसवणुक करणारे घेत आहेत. या प्रकारांमुळे सामान्यांना अनेकदा आपली आयुष्यभराची जमापुंजी देखील गमवावी लागते. तर आशा घटनांच्या तक्रारी देखील न आल्याने संबंधितांना लुबाडलेली रक्कम परत मिळवून देणे बँकांना शक्य होत नाही.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ग्राहक आयोगाने ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरलेल्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हॅकरनी ग्राहकांच्या खात्यातील रक्कम ऑनलाइन हॅकिंग आणि फ्रॉडद्वारे गायब केल्यास घडलेल्या प्रकाराची संपूर्ण जबाबदारी बँकेची असेल असा निर्वाळा नुकताच आयोगाने दिला. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
बारा वर्षांपूर्वीच्या एका गुन्ह्याचा निकाल देताना आयोगाने ऑनलाइन फसवणुकीसाठी बँकिंग यंत्रणेला जबाबदार धरले आहे. हॅकरने आपल्या खात्यातील रक्कम लांबविल्याची तक्रार एका महिला ग्राहकाने केली होती. या घटनेसाठी ग्राहकाने बँकेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग सिस्टीमला जबाबदार धरले. संबंधित महिला ग्राहकाचे क्रेडिट कार्ड चोरीला गेल्याचा कोणताही पुरावा बँकेने सादर केलेला नाही, असेही आयोगाने आदेशात नमूद केले. त्यानंतर आयोगाने पीडित ग्राहकाला बँकेने नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला.
यासाठी ग्राहकांना रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार फसवणूक झाल्याच्या तीन दिवसांत बँकेत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. तरच संबंधित ग्राहक संपूर्ण नुकसानभरपाई मिळविण्यासाठी पात्र ठरतो. घटना घडल्यापासून चार ते सात दिवसांच्या आत तक्रार केल्यास ग्राहकाला ५ हजार रुपये ते २५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाईल. सात दिवसांनंतर तक्रार नोंदवल्यास नुकसानभरपाईची रक्कम किती असेल, हे बँकेच्या धोरणावर अवलंबून असते.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ !
- वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
- ‘मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ’लाभ
- ऐकावं ते नवलच! भर मांडवातून नवरा प्रियेसीसोबत गेला पळून; नवरीने केले चक्क वऱ्हाड्याशी लग्न
-
राज्यशासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधील – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
