🕒 1 min read
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात ते आपल्या गाण्यांमुळे त्याचबरोबर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. नुकतंच अमृता फडणवीस यांचं ‘अंधार’ हे गाणं रिलीज झालं आहे. अमृता फडणवीस यांनी हे गाणं आपल्या ट्विटरवर पोस्ट केलं आहे. ‘अंधार’ चित्रपटाचे टायटल गाणे अमृता फडणवीस यांनी गायले आहे. खास म्हणजे अमृता फडणवीस यांनी हे गाणे मराठीमध्ये गायले आहे. त्यांचं हे गाणं जोरदार व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या गाण्यानंतर अनेकांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
Presenting my new Jazz song for upcoming @zeemusicmarathi suspense thriller movie- ‘अंधार’! A song of fear,indecisiveness beautifully composed by @jeetmusic . Listen to it ???? https://t.co/Iig1WOyKNF
मराठी चित्रपट ‘अंधार‘ मधील @jeetmusic यांनी संगीतबद्ध केलेले माझे गीत नक्की ऐका☝️ pic.twitter.com/xcF4f9tGdf— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 7, 2021
दरम्यान, अमृता फडणवीस यांना अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. त्यांचे गाणे असो वा एखाद्या विषयावर ट्विटरद्वारे त्यांनी प्रकट केलेले विचार, नेटकऱ्यांसह अनेक चर्चांमध्येही त्यांच्यावर टीका केली जाते. देवेंद्र फडणवीस यांनी देखील ती सल काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती.
याआधी ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. या गाण्याला त्यांना बऱ्याच टीकेचाही सामना करावा लागला होता. या गाण्यावर अक्षरशः डिसलाईक्सचा वर्षाव करण्यात आला होता. या गाण्याचा आशय चांगला असला तरी राजकीय विरोधाने ट्रोल केलं जातं असं देखील त्या म्हणाल्या. त्यातच आता अमृता फडणवीस यांचं हे गाणं किती हिट ठरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस भरतीबाबत शुद्धी परिपत्रक काढणार; अनिल देशमुखांनी ग्वाही दिल्याचा मेटेंचा दावा
- सिंधुताईंच्या मदर ग्लोबल फाउंडेशनला मिळणार सामाजिक न्यायच्या अनुदानित वसतिगृहाची साथ
- बांधकाम प्रकल्पांना प्रिमियमच्या निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही : देवेंद्र फडणवीस
- राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली जाणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ
- ग्रामीण भागातील रस्ते आता दर्जेदार होणार; केंद्र सरकारशी सामजंस्य करारास मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
