Share

ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह

Published On: 

नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर सुरु असलेला वितंडवाद आज टोकाला गेलेला पहायला मिळाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून आत घुसून मोठा गोंधळ घातला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूक निकालांबाबत तेथील संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणाही केली जाणार होती. पण, त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, ज्यामुळं संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर एकच गोंधळ घातला.

दरम्यान, क्षणार्धातच या आंदोलनाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. या धुमश्चक्रीत एका आंदोलक महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. या घटनेनंतर वॉशिंग्टन डिसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.

या घटनेवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी भाष्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत जे करत आहेत, तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात करत आहेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या ट्विटला रिट्विट करत दिग्विजय सिंह म्हणाले, बिल क्लिंटन, आम्ही तुमचे विचार शेअर करतो. ट्रम्प अमेरिकेत जे काय करत आहेत, तेच त्यांचे मित्र मोदी भारतात करत आहेत. भारतीय लोकांचे विभाजन आणि भारतीय राज्यघटना बिघडवण्याचा त्यांचा हेतू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!