🕒 1 min read
मुंबई:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे, संभाजीनगर व्हावे अशी मागणी करणाऱ्या व राज्यासह औरंगाबाद महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची मात्र मोठी कोंडी झाली आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फेसबुक पोस्ट करत पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराला आपला तीव्र विरोध आहे असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुन्हा एकदा काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध केल्यामुळे भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ‘औरंगाबादच्या नामकरणाला कडाडून विरोध करून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली आहे. मालकीण इटालियन असल्याचे परिणाम दुसरं काय?, असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ !
- वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
- ‘मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ’
- ऐकावं ते नवलच! भर मांडवातून नवरा प्रियेसीसोबत गेला पळून; नवरीने केले चक्क वऱ्हाड्याशी लग्न
- राज्यशासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधील – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
