Share

यादीतील उमेदवारांची २०१८ पासून ‘प्रतिक्षा’ संपेना, आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र पोलीस भरती २०१८ मधील प्रतिक्षा यादीत जिल्ह्यातील ३० उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झालेली आहे. मात्र, त्यांना सेवेत रुजु करुन घेण्यात आलेले नाही. त्यांना सेवेत रुजू करुन घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मागणी मान्य झाली नाही तर आझाद मैदनात आंदोलन करण्याचा इशाराही या उमेदवारांनी दिला आहे.

जिल्हाधिकऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, २०१८ महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीमधील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पोलीस सेवेत समाविष्ट करुन घ्यावे. गेल्या तीन वर्षापासून भरती नाही, कोरोनाचे संक्रमण अद्याप कमी झालेले नाही. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या या भरतीला आणखी उशीर होत आहे. त्यामुळे शासनाने यादी खुली करुन या उमेदवारांना रुजू करुन घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या यादीतील काही उमेदवार वयातून बाद झाले आहेत. त्यामुळे त्यांना दुसरी भरती देणे शक्य नाही. त्यामुळे या युवकांचे भविष्य अंधारात आणि नैराश्यात जात आहे. यामुळे सरकाने तत्काळ निर्णय घेऊन आम्हाला सेवेत रूजु करुन घ्यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी ज्ञानेश्वर पवार, शेख रेश्मा चांद, लहु चिंचपुरे, सांडु पवार आदिंची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!