Share

योगींसाठी प्रतिष्ठेची तर कॉंग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ; युपीत भाजपसमोर आव्हाने काय असणार ?

Published On: 

लखनौ – उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. राम मंदीराचा मुद्दा निकाली काढल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भाजपचे कोणत्याही परिस्थितीमध्ये युपीची सत्ता टिकवणे हेच ध्येय असून यासाठी जोरदार मोर्चेबांधणी देखील सुरु झाली आहे.& या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकामागून एक पावले उचलली जात आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मनोधैर्य वाढविण्यासाठी भाजप नेतृत्वाने अनेक आघाड्यांवर काम सुरु केले आहे. निवडणुकीचा प्रचार सुरु होण्याआधी पक्षाने कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी राज्यातील मंत्र्यांना जिल्ह्यांमध्ये दौरे करुन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सांगण्यात आलं आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह कोरोना पीडितांच्या घरी जात आहेत आणि त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.योगी सरकारने विविध महामंडळ, कमिशन आणि संस्था यांच्या रिक्त जागांवर नियुक्त्या करण्याचे काम सुरू केले. यूपीमध्ये सात महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता योगी सरकारने आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना खूष करण्यास सुरुवात केली आहे.

आगामी निवडणुकीत भाजपसमोर सत्ता राखण्यात यश मिळवणे गरजेचे तर आहेच मात्र मागील निवडणुकीपेक्षा मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न देखील करावा लागणार आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीत काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लढत देण्यासाठी पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना पक्षाचा चेहरा बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात सक्रिय आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यातील भाजप सरकारवर त्या सातत्याने हल्लाबोल करीत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीकिनारी मोठ्या संख्येनं मृतदेह आढळल्यानंतर या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या संख्येनं करोना रुग्णांची आकडेवारी लपवली जात आहे, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांमुळे रुग्णवाढ झाली, मृतांचे आकडे लपवण्यासाठी गंगेमध्ये मृतदेह टाकून देण्यात आले असे आरोप झाले.कोरोना काळात नदीत वाहणारे मृतदेह योगी सरकारची डोकेदुखी ठरले होते या मुद्द्याचा वापर विरोधक आगामी निवडणुकीत करतील अशी शक्यता आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्या, शेतकरी, दलित अल्पसंख्यांक यांच्या समस्या देखील योगीसाठी अडचणी वाढवू शकतात. युपीत ब्राह्मण मतदारांची संख्या लक्षणीय असून हा समाज देखील काहीअंशी भाजपवर आणि योगींवर नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळेच कट्टर विरोधक असणाऱ्या कॉंग्रेसमधील जितीन प्रसाद या ब्राह्मण समाजाच्या  नेत्याला भाजपने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. योगी सरकारवर नाराज असलेल्या ब्राह्मण मतदारांना एकत्र आणण्यासाठी प्रियांका गांधी वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी, राजेश त्रिपाठी आणि आचार्य प्रमोद कृष्णन या ब्राह्मण समाजातील नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

भाजपला रोखण्यासाठी समाजवादी आणि बसपाने देखील जोरदार तयारी केली आहे. भाजप हिंदुत्व व आणि राममंदिर कार्यक्रमावर ही निवडणूक लढणार हे स्पष्ट असल्याने कॉंग्रेस,समाजवादी,आणि बसपा देखील हिंदू धर्मियांच्या भावना लक्षात घेत पावले टाकतील अशा वेळी आपणच या सर्वांपेक्षा उजवे कसे आहोत हे भाजपा दाखवून द्यावे लागेल. यूपीतील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि बसपा सोबत आघाडी करणार नाही, असं समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं आहे.यामुळे मतांची विभागणी निश्चित असल्याने याचा फायदा घेण्याचे देखील प्रयत्न भाजपला करावे लागणार आहेत.

उत्तर प्रदेशात मोठ्या संख्येने प्राथमिक व कनिष्ठ शिक्षक आहेत. कोरोना कालावधीत झालेल्या पंचायत निवडणुकीत कर्तव्य बजावत असताना संक्रमित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा मृत्यू झाला होता. अशा परिस्थितीत शिक्षकांची नाराजी लक्षात घेता योगी सरकारने नाराजी कमी करण्याचे काम करावे लागणार आहे. याशिवाय मित्रपक्ष सोबत ठेवणे, बंडखोरी रोखणे,पक्षांतर्गत असणारे मतभेद मिटवून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याचे देखील आव्हान योगींच्या समोर असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!