Share

“बाबरी पाडली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं” ; रुपाली पाटलांचा खोचक सवाल

Published On: 

पुणे : “बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती ? शिवसेनेचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हता, मात्र बाबरी पाडली तेव्हा आपण तिथे उपस्थित होतो,” असं वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या बूस्टर डोस सभेत केली होती होती. त्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. बाबरी मस्जिद पडली गेली तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं वय काय होतं? असा खोचक सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारला.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमागे भाजपचा हात आहे. मुख्यमंत्रीपदाची आस लावून बसलेले देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. असा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. काही प्रवृत्तींचा राज्यात दंगली घडवण्याचा कट आहे. मात्र तसं राज्यात काहीच होणार नाही. महाविकासाघाडी यासाठी भक्कम आहे. राज ठाकरे यांच्या भाषणात अनेक विषय आले आहेत. त्याची तपासणी पोलीस करत आहेत. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या भाषणा मुळे जर काही घटना झाल्या, तर कारवाई होईलच, असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

ज्या पक्षात सर्व जातीधर्माचे लोक काम करतात, ब्राह्मण, मराठा, हिंदू, मुस्लीम, शीख,आणि ओबीसीच्या पोट जाती आहेत. म्हणजेच अठरापगड जातीचे लोक पक्षात काम करत आहेत. अशा पक्षाचा अध्यक्ष जातीयवादी कसा असू शकतो, असा सवाल ही रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!