Share

“ताई तुज ‘गुणी’ म्हणू की ‘अवगुणी’ गं?”, अमृता फडणवीस यांच्या टीकेवर शिवसेनेची प्रतिक्रिया!

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमृता फडणवीस यांना काल महाउत्सव कार्यक्रमात अप्रत्यक्ष टोला लगावला होता. या महाउत्सव प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात.’ या टीकेवर उत्तर अमृता फडणवीसांनी मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्त आपणच आहात. पण आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे, असे म्हणत टीका केली. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या टीकेवर आता मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरूखकर (Sheetal Sheth-Devrukhkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात शीतल यांनी ट्विट केले असून त्या म्हणाल्या आहेत की,‘पोलिसांच्या पगाराची खाती पत्नीच्या हट्टापाई रातोरात अॕक्सिस बँकेत हलवणारा सर्वगुण संपन्न पतीराज आणि त्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या जोरावर फिल्मी दुनियेत धुडघुस घालणारी मत्सरी पत्नी. छान लुट चालली होती कुटुंबाची. अमृता फडणवीस ताई तुज ‘गुणी’ म्हणू की ‘अवगुणी’ गं?’, असे शीतल म्हणाल्या आहेत.

दरम्यान, ‘मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात’, असे अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देत म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!