मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (१ मे ) औरंगाबद येथे सभा घेत पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला त्यांच्या सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेनंतर ऐकणार नाही, असा अल्टीमेटम त्यांनी दिला आहे. यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
“असह्य झालेली महागाई आणि बेरोजगारीवरुन लक्ष उडवून मोदी सरकारचं अपयश लपविण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांना सुपारी दिली आहे. पण या सुपारीबाजाला जनता ओळखून आहे. त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.”, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
असह्य झालेली महागाई आणि बेरोजगारीवरुन लक्ष उडवून मोदी सरकारचं अपयश लपविण्यासाठी
भाजपने राज ठाकरे यांना सुपारी दिली आहे. पण या सुपारीबाजाला जनता ओळखून आहे. त्याचा कोणताही परिणाम होणार नाही— Nana Patole (@NANA_PATOLE) May 2, 2022
तसेच काल देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचे भाषण केले त्याच पद्धतीचे राज यांचे भाषण होते. जनतेच्या मूळ प्रश्नावर ते बोलतील अशा अपेक्षा होत्या. मात्र भाजपकडून केंद्र सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे सुरु झालं आहे. धार्मिक अस्थिरतेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्यांबद्दल साधारण सर्व ठिकाणी कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्यांचा निर्वाणीचा इशारा कुठेही कामात येणार नाही. महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा प्रयत्न थांबवावा. असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला. तसेच ४ तारखेपासून मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आवाहनाला शासन सक्षम असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “इतिहास बदलण्याची ताकद राऊतांमध्ये नाही”; आशिष शेलारांचा घणाघात
- “देश इस्लामच्या दिशेने जातोय, हिंदू राष्ट्राची स्थापना राजकारणातून शक्य”- कालीचरण महाराज
- IPL 2022 SRH vs CSK : मॅच जिंकत असताना कॅप्टन धोनी तापला; ‘या’ खेळाडूवर काढला राग!
- “अजून किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही?”, नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
- “…पण त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार केलाच नाही”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नवा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

