🕒 1 min read
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात Instagram हे सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आजकाल क्वचितच कोणी असेल जे इंस्टाग्राम वापरत नसेल. इंस्टाग्राम हे सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम अनेक इंटरेस्टिंग फीचर्ससह उपलब्ध आहे. आणि या फीचर्स लोक पूर्णपणे उपयोग करून घेतात. पण याचवेळी आपण दररोज सोशल मीडिया हॅकिंगच्या बातम्या ऐकत असतो. इंस्टाग्राम यूजर सुद्धा या हॅकिंग पासून वाचलेले नाही. पण इंस्टाग्राम आपल्या युजर्सना त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट रिकव्हर करण्याची संधी देते. जर तुम्ही कधी या हॅकर्सचे बळी पडले असाल आणि तुमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले असेल, तर या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे अकाउंट रिकव्हर करू शकतात.
कसे करायचे ?
इंस्टाग्राम अकाउंट हॅक होत आहे अशी शंका जर तुमच्या मनात आली तर लागेलच आपल्या अकाउंटचा पासवर्ड बदला. कारण एकदा तुमच्या अकाउंट हॅक झाले तर तुम्ही पासवर्ड बदलू शकत नाही.
इंस्टाग्राम अकाउंट रिपोर्ट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :
- तुमच्या ओळखीतल्या इंस्टाग्राम युजर्स ना तुमच्या इंस्टा प्रोफाइलला भेट द्यायला सांगा.
- त्यानंतर त्यांना त्या विंडोवरील उजव्या बाजूस असलेल्या हॅम्बर्ग आयकॉन वर क्लिक करायला सांगा.
- आता समोर रिपोर्ट ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायला सांगा.
- आपण हे अकाउंट का रिपोर्ट करतोय यासाठी तुम्हाला काही कारणांचे पर्याय समोर येतील. त्यातील एक पर्याय निवडा.
- तुम्ही त्या कारणांपैकी एक कारण निवडू शकता किंवा तुम्ही तुमची थेट तक्रार सुद्धा नोंदवू शकता.
- यानंतर Someone I know या ऑप्शन वर क्लिक करा.
- अकाउंट रिपोर्ट झाल्यानंतर इंस्टाग्राम पुढच्या प्रक्रिया करेल.
आपल्या अकाउंटचा एक्सेस परत मिळवण्यासाठी काय करावे ?
तुमचे अकाउंट हॅक झाल्यानंतर हॅकर तुमच्या अकाउंटचा पासवर्ड बदलू शकतो. ज्यामुळे तुम्ही तुमचे अकाऊंट लॉगिन करू शकत नाही. पण तुम्ही E-mail च्या मदतीने इंस्टाग्राम लॉगिन रिक्वेस्ट करू शकता.
- E-mail केल्यानंतर इंस्टाग्राम आपले इनबॉक्स मध्ये एक लिंक पाठवेल, तो मेल उघडा आणि नंतर सूचनांचे अनुकरण करा.
- तुम्ही सिक्युरिटी कोड च्या मदतीने सुद्धा अकाउंट रिकव्हर करू शकता
- इंस्टाग्राम उघडल्यावर लॉगिन स्क्रीनवर Get Help Logging पर्याय दिसेल. तो पर्याय निवडा.
- त्यानंतर आपले युजरनेम ई-मेल आयडी आणि फोन नंबर टाका. स्क्रीनवर ज्या ज्या सूचना येतील त्या फॉलो करा आणि नंतर सेंड सिक्युरिटी कोड वर क्लिक करा.
- आता परत एकदा तुमचा ईमेल बॉक्स चेक करा त्यावर तुम्हाला एक कोड आलेला असेल.
- हा कोड इंस्टाग्राम वर टाका आणि अकाउंट रिकव्हर करण्यासाठी आयडेंटि वेरिफिकेशन करा.
महत्वाच्या बातम्या
- BJP | “… तर २०१४ मध्ये उद्धव ठाकरेच काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यासाठी गेले असतील”; बावनकुळेंचा पलटवार
- Uddhav Thackeray | धनुष्यबाण कुणाला मिळेल? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी काय? जाणून घ्या सविस्तर
- Chhagan Bhujbal | मी कोणाला अपमानकारक बोललो नाही, मी केवळ इतिहास सांगितला – भुजबळांचं ‘त्या’ वक्तव्यावरुन स्पष्टीकरण
- Maruti Car Update | मारुती सुझुकीच्या ‘या’ दोन SUV पुढच्या वर्षी मार्केट मध्ये धुमाकूळ घालण्यास सुसज्ज
- Shivsena । “एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, पण…”, चव्हाणांनंतर खैरेंचा मोठा दावा
- Health Tips | बदलते हवामान तुमच्या डोकेदुखी चे कारण असेल तर, ‘ हे ‘ घरगुती उपाय नक्की करून बघा
- Supreme Court Decision | महिला अविवाहित असो वा विवाहित प्रत्येकीला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
- Ashish Shelar | “अशोक चव्हाण यांची एक क्लिप जाहीर केली तर…”, आशिष शेलारांचा इशारा
- Supriya Sule | “वर्षभरात केवळ १५ सिलिंडर मिळणार?” ; सुप्रिया सुळेंची आक्रमक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
