Share

Chhagan Bhujbal | मी कोणाला अपमानकारक बोललो नाही, मी केवळ इतिहास सांगितला – भुजबळांचं ‘त्या’ वक्तव्यावरुन स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई :  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप युवा युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते आणि त्यांनी नाशिकमध्ये भुजबळ यांच्या फार्म हाऊस बाहेर आंदोलन केलं होतं. या सर्व प्रकारानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांची प्रतिक्रियाः

मी कोणाचा अपमान केला नाही, मी हिंदूच आहे, आमच्या घरातही देवीची पूजा होते, मी सुद्धा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो, आमच्याही घरात घटस्थापना होते पण अंधश्रद्धेला आमचा विरोध आहे, असं छगन भुजबळांनी यावेळी म्हटलं आहे.

सरस्वती देवीचे आपण पूजन करतो, सरस्वती देवीने तर काय आपल्याला शिकवले नाही, त्यांनी शाळा काढली नाही, जर सरस्वती विद्येची देवी आहे, तर बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून का दूर ठेवलं, ब्राह्मणांच्या मुलींनाही शिकू दिलं नाही, मी कुठेही सरस्वती देवीचा फोटो काढा, असं मी म्हणलो नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले होते भुजबळः

दरम्यान, देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी कार्यक्रमात केला आहे. तसेच पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं देखील भुजबळ म्हणाले होते. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणी देखील भुजबळांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!