Share

BJP | “… तर २०१४ मध्ये उद्धव ठाकरेच काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यासाठी गेले असतील”; बावनकुळेंचा पलटवार

Published On: 

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण त्यांच्या एका वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. आता अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि एखनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येण्याची तयारी दर्शवली होती, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण बोलले. यावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

एकनाथ शिंदे यांच्याबाबत अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्त्यावर बावनकुळे म्हणाले की, २०१४ मध्ये तर एकनाथ शिंदे शिवसेना चालवत नव्हते. शिवसेना उद्धव ठाकरे चालवत होते. त्यामुळे अशोक चव्हाण शिंदेंचं नाव घेऊन संभ्रम निर्माण करतायत. उलट उद्धव ठाकरेच सरकार स्थापन करण्यासाठी गेले असतील, असं ते म्हणाले तर पुढे चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले कि, चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासु बनण्याकरिता ते ऍक्टिव्ह झाले आहेत. उद्धव ठाकरेंचे एकदम तारक म्हणूनच ते काम करतायत, असंही ते म्हणालेत.

अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले होते ?

२०१४ मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसला प्रस्ताव आला होता आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवण्यात आलं होतं. मात्र, विशेष बाब म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे देखील होते. त्यावेळी चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं होतं, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!