मुंबई : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला बेबी एबी अर्थात डेवाल्ड ब्रेविसने एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आऊट झाल्यानंतर कोहली चांगलाच रागावलेला दिसत होता. वास्तविक कोहली अंपायरच्या निर्णयाने नाराज होता. यामुळेच कोहली रागाच्या भरात पॅव्हेलियनमध्ये परतला. हा सामना जिंकण्यात आरसीबीला यश आले.
आता सामन्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. विराट या मॅचनंतर पहिल्यांदाच बेबी एबीला भेटला आणि त्याने ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली ती खूप व्हायरल होत आहे. विराटने बेबी एबीशी हस्तांदोलन केले आणि म्हणाला, ”होय.. पहिली भेट,’ खूप छान, आमची पहिली भेट खूप छान होती, पहिल्याच चेंडूवर मला आऊट केलेस, तुला इथे कसं वाटतंय, मजा येतेय ना?.. चांगला अनुभव असेल.”
हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने पोस्ट केला आहे. या सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हिस पहिल्यांदा गोलंदाजी करायला आला तेव्हा त्याने विराट कोहलीला त्याच्या पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट केले. कोहलीने डीआरएस घेतला असला तरी पंचांनी त्याला बाद घोषित केले होते. विराटने या सामन्यात ४८ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
- “राज नाही तर उद्धवच बाळासाहेबांचे खरे वारसदार”; रामदास आठवलेंचं मत
- राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मी शेवटपर्यंत…”
- INS VIKRANT घोटाळा: किरीट सोमय्या गुजरातमध्ये असल्याची माहिती!
- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संजय राठोडांना हवंय पुन्हा मंत्रिपद
- पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


