मुंबई: मनसे अध्यक्ष राजा ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना पुत्ररत्न लाभले आहे. 5 एप्रिल 2022 रोजी दुपारी राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. घरात आलेल्या या चिमुकल्या पाहुण्याचा फोटो अमित ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. काही क्षणातच हा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे.
अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता, तर 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते. अमित यांनी बाळाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे.सोबतच हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. अवघ्या काही तासांत या फोटोवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत.
मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहे. शिवाय त्या उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करतात. या दोघींनी मिळून जुडवा टू या चित्रपटासाठी काम केलं आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातुन तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातुन झाले. तेथेच त्यांची ओळख झाली व या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.आता या दोघांनाही पुत्ररत्न लाभले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“राज नाही तर उद्धवच बाळासाहेबांचे खरे वारसदार”; रामदास आठवलेंचं मत
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मी शेवटपर्यंत…”
INS VIKRANT घोटाळा: किरीट सोमय्या गुजरातमध्ये असल्याची माहिती!
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संजय राठोडांना हवंय पुन्हा मंत्रिपद
पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

