औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं आक्षेपार्ह विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलंच भोवलं आहे. रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना जन आशीर्वाद यात्रेदरम्यानच संगमेश्वरमधून अटक केली आहे. गोळवली येथे अटकेची कारवाई केली जात असताना प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या कारवाईने भाजपचे कार्यकर्ते तसेच राणे समर्थक संतप्त झालेत.
राणेंवरील कारवाईनंतर राज्यातील नव्हे तर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनीही ठाकरे सरकारचा निषेध केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना करण्यात आलेली अटक म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी देखील नारायण राणे यांच्यावर केलेल्या कारवाईची निषेध केला आहे.
राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्यासह जवळपास सर्वच नेत्यांनी ठाकरे सरकारविरोधात हल्लाबोल सुरू केला आहे. भाजपच्या आक्रमक पावित्र्यामुळे सध्या शिवसेनेचे नेते बॅकफुटवर असल्याचे दिसत आहेत. मात्र, या सर्वांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्टीय सचिव पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांची आतापर्यंत म्हणजे सायंकाळी ६.३० पर्यंत काहीच प्रतिक्रिया आलेली नाहीये. सोशल मीडियावर राणेंच्या कारवाईवर अद्यापही त्यांनी एक शब्दही पोस्ट केलेला नाही.
भाजपमधील आक्रमक चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. प्रसंगी त्यांनी हे दाखवून दिलेले आहे. मात्र, राणेंच्या बाबतीत पंकजा यांनी आपली शाब्दिक तलवार का म्यानात ठेवली आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या महिन्यांत केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. त्यावेळी त्यांनी कोणत्याच नुतन मंत्र्यांचे अभिनंदन न केल्याने या चर्चेला बळ मिळाले. यावर त्यांनी नंतर खुलासाही केला होता.
एरवी परळी सारख्या नगरपालिकेतील गैरभारावरून पंकजा यांनी सोशल मीडियावरून आवाज उठवला आहे. मात्र, आता पक्षाच्या थेट कॅबिनेट मंत्र्यांला अटक केल्यानंतरही त्यांनी मौनव्रत धारण केल्याने अद्यापही त्या नाराज आहेत का अशी शंका उपस्थित होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- ‘नारायण राणे साहेबांच्या जीवाला धोका’ ; प्रसाद लाड यांनी व्यक्त केली भीती
- शिवसेनेच्या महापौरांची जीभ घसरली अन् म्हणाल्या नारायण राणे अंगार है…
- ‘दुरी तिरी एक्का, नारायण राणे छक्का, ‘ औरंगाबादेत युवासेना आक्रमक!
- ‘राणेंना अटक ही महाविकास आघाडीची घोडचूक’, विनोद तावडेंची प्रतिक्रिया
- नारायण राणेंना रुग्णालयात दाखल करण्याची गरज; तपासणीनंतर डॉक्टरांच मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

