औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानशिलात लगावणार असल्याचे वक्तव्य राणे यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादेत शिवसेनेनंतर आता युवासेनेनेदेखील आक्रमकपणे ‘दुरी तिरी एक्का, नारायण राणे छक्का’, ‘कोंबडी चोर’ आदी घोषणा देत’ क्रांती चौकात नारायण राणेंचा पुतळा जाळण्यात आला. युवा सैनिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
महाड याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा हे एखाद्या मुख्यमंत्र्यांला माहीत नाही ही गोष्ट गंभीर आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव की हिरक महोत्सव ही गोष्ट मुख्यमंत्री सचिवांना विचारतात. हा देशाचा अपमान आहे. राष्ट्रद्रोह आहे. मी असतो तर कानाखालीच लगावली असती.
राणेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर संतापले असून ठिकाणी आंदोलन आणि निदर्शने केली जात आहेत. औरंगाबादेत युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेद्वारे जोरदार आंदोलन करण्यात आले. नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडण्यात आला होता. युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, जिल्हा प्रमुख हनुमान शिंदे, नगरसेवक ऋषी खैरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कर्णधारपदावर अधिक भर दिल्यामुळे कर्णधार कोहली आपली फलंदाजी विसरला’
- हेमांगी कवीचे पुन्हा एकदा नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर, म्हणाली
- ‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका
- नारायण राणेंना मोठा धक्का! रत्नागिरी कोर्टाने अटकपूर्व जामिन फेटाळला, अटकेची टांगती तलवार कायम
- नारायण राणेंना अटक अटळ? रवानगी नाशिक की पुण्याला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

