Share

‘राणेंना अटक ही महाविकास आघाडीची घोडचूक’, विनोद तावडेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. राणेंना अटक झाल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. तर, भाजपा नेत्यांकडून राज्य सरकार टीका करण्यात येत आहे.

भाजपा नेते विनोद तावडे यांनी राणेंना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव का अमृत महोत्सव माहिती नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्याबद्दल संकोच न वाटता, त्या विरोधात बोलणारे नारायण राणे यांना अटक करणे निषेधार्ह आहे. ही महाविकास आघाडीची राजकीय घोडचूक आहे असे ट्विट तावडे यांनी केले आहे.

डॉ. संजय कुटे यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे यापेक्षा जास्त महाराष्ट्राचे दुर्दैवी काय असू शकते. पुन्हा बळाचा वापर केला जातोय, असे कुटे यांनी म्हटले आहे. तर, सुनिल देवधर यांनीही ट्विट करुन शिवसेनेचं हे तालिबानी रूप असल्याचं म्हटलंय. शर्जिल उस्मानी समोर शिवसेनेने गुढघे टेकून सपशेल शरणागती पत्करली आणि नारायण राणेंसमोर पुरुषार्थ दाखवते आहे, असे देवधर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!