Share

‘न्यायासाठी आंदोलन हा काय गुन्हा आहे? नाशिकमध्ये मोगलाई आलीये का?’, फडणवीस संतापले

Published On: 

नाशिक: नाशिक येथे पॅरोलवर सुटलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने सिडको परिसरातील एका ब्यूटी पार्लरमध्ये बळजबरीने प्रवेश करीत तेथील एका महिलेला चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा नितीन अशोक पवार या आरोपीला पोलिसांनी सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले आहे. या अत्याचाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे.

दरम्यान, नाशिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करून पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी अंबड पोलीस ठाणे येथे ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी नाशिकमधील भाजपा आमदार सीमा हिरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ नुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘आरोपीवर कठोर कारवाई करणे सोडून पीडितेसाठी न्याय मागणाऱ्यांवर गुन्हे आणि तीही इतकी कलमे दाखल केली गेली. न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन हा काय गुन्हा आहे? नाशिकमध्ये मोगलाई आली आहे का?’ असा संतप्त सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

‘नाशिक जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्यांतर्गत ब्युटी पार्लरमध्ये शिरून बलात्कार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा, यासाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्याचा पराक्रम नाशिकच्या पोलिसांनी केला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करणे सोडून पीडितेसाठी न्याय मागणाऱ्यांवर गुन्हे आणि तीही इतकी कलमे दाखल केली गेली. न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन हा काय गुन्हा आहे? नाशिकमध्ये मोगलाई आली आहे का?’ असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?
पीडित विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीचे निधन झाले आहे. उदरनिर्वाहासाठी ती ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करते. संशयित हा तिच्या घराच्या मागे राहतो. काही दिवसांपूर्वी तो मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला आहे. संशयिताने सोमवारी अचानक पार्लरमध्ये प्रवेश करत शटर लावून घेत महिलेचे सुरुवातीला हात पाय बांधले. त्यानंतर तोडात बोळा घालून दोन तास अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

नाशिक पोलिसांची भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचारातील गुन्ह्यासंदर्भात पोलीस यंत्रणेकडून तपास सुरु असताना भाजपच्या वतीने आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीष पालवे, नगरसेविका छाया देवांग, प्रतिभा पवार, नगरसेविका अलका अहिरे, कावेरी घुगे, नगरसेवक मुकेश शहाणे, हर्षा फिरोदिया, जगन पाटील, यांच्यासह २० ते २५ जणांनी पोलिस ठाण्यात येऊन ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे या गंभीर गुन्हयाच्या तपासाच्या वेगाला बाधा आणली तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले असे आरोप करून वरील सर्वांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!