Share

‘रस्ते कंत्राटदारांवर कारवाईची हिंमत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात आहे का?’ नितेश राणेंचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील खड्ड्यांच्या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुधवारी संध्याकाळी ६ वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. राज्यातील खड्ड्यांबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर पडलेल्या खड्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल. मुंबईच नव्हे तर राज्यातल्या सर्वच भागात पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यांमध्ये रस्ते असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा सामान्या नागरिकांसह मंत्र्यांनाही त्रास होत असल्याचे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आले. रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. केवळ अधिकाऱ्यांवर तात्कालिक कारवाई करून भागणार नाही, तर रस्त्यांच्या दर्जाबाबत जबाबदारी निश्चित करावी लागेल अशी भावना मंत्र्यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खड्ड्यांच्या समस्यांवर बैठक बोलावण्याचा निर्णय घेतलाय.

यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. ‘शिवसेनेच्या जवळ असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहे? की ही फक्त नौटंकी आहे?’ अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

‘मुख्यमंत्री ठाकरे सर्व संबंधित यंत्रणांना भेटत आहेत आणि मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी इंजिनिअर्सवर निश्चित करत आहेत. रस्ते तयार करणाऱ्या कंत्राटदारांना करदात्यांचा पैसा दिला जातो. पण तरी ते त्यांचे काम चोख करत नाहीत. मग मुख्यमंत्री कंत्राटदारांना शिक्षा का करत नाही?’ असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांमधील रस्ते खड्डेमय झाल्याचा विषय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निघाला. उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी खड्ड्यांच्या समस्येबाबत नाराजी व्यक्त केली. राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी यंत्रणेला आदेश दिल्याची माहिती देत अशोक चव्हाण यांनी दिली. परंतू राष्ट्रीय महामार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी चर्चा करावी लागेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर आज राज्यातील खड्ड्यांच्या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुधवारी संध्याकाळी ६ वाजता तातडीची बैठक बोलावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!