मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहेत. सोमवारी चौकशीसाठी ईडीचे अधिकारी अडसूळ यांच्या कांदिवलीच्या घरी दाखल झाले होते. अडसूळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा होती. मात्र, अचानक अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यामुळे आनंदराव अडसूळ यांची चौकशी काही दिवसांसाठी टळली. मात्र, मिळालेल्या माहितीनूसार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून प्रकृती पूर्ववत झाल्यावर त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे एक अधिकारी वगळता ईडीचे पथक रुग्णालयातून माघारी परतले आहे. त्या अधिकाऱ्याला अडसूळ यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
अडसूळांवर नेमके आरोप काय?
सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होती. त्यातील जवळपास ९ हजार खातेधारक होतो. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप बडनेराचे (जि.अमरावती) अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.
दरम्यान, आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवलीच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर त्यांच्या अमरावतीच्या नवसारी घरावरही ईडीने छापा टाकल्याची चर्चा होती. पण, अमरावती येथील त्यांच्या घरी ईडीने छापा टाकला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी आनंदरावर अडसूळ यांनी बीपी व शुगरचा त्रास असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोमवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. आनंदराव अडसूळ यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
- राजकीय नेत्यांच्या फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, म्हणाले..
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- ‘भाजपचा ईडी, सीबीआयद्वारे कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न’, राऊतांचा गंभीर आरोप
- ‘सध्या भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करू नका’, राज ठाकरेंच्या पक्षनेत्यांना सुचना

