Share

‘महिलांवर हात टाकल्यांनतर फरार आरोपींना पकडणार आहात का?’, चित्रा वाघ यांचा पोलिसांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन महिलांच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या व सध्या पॅरोलवर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने ३१ वर्षीय विधवा महिलेवर तिच्याच ब्यूटी पार्लरमध्ये घुसून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक येथील श्रीरामनगर पवननगर येथे घडला. याप्रकरणी संशयित गुन्हेगार नितीन सुभाष पवार याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. ‘नाशिक-पवननगर व्यावसायीक महिलेवर खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. फरार आरोपीबाबत जेल प्रशासनाने पोलिसांना कळवले होते मग शोध घ्यायचा प्रयत्न का झाला नाही?? असे अजून किती आरोपी फरार आहेत त्यांनी महिलांवर हात टाकल्यांनतर पोलिस त्यांना पकडणारेत का? पोलिसांचा धाक का वाटत नाहीये?’

‘कधीतरी होणारे कोम्बिक ऑपरेशन नियमित होण्याची गरज आहे. जेल प्रशासनाने असे अजून किती फरार आरोपींची यादी नाशिक पोलिसांना दिलीये त्यावर कारवाई होणार की फक्त कागदी घोडे नाचवले जाणार’ असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

दरम्यान, पीडित विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीचे निधन झाले आहे. उदरनिर्वाहासाठी ती ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करते. संशयित हा तिच्या घराच्या मागे राहतो. काही दिवसांपूर्वी तो मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला आहे. संशयिताने सोमवारी अचानक पार्लरमध्ये प्रवेश करत शटर लावून घेत महिलेचे सुरुवातीला हात पाय बांधले. त्यानंतर तोडात बोळा घालून दोन तास अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!